तुका म्हणे मज घडो त्याची सेवा..!
तरी माझ्या देवा पार नाही..!
आषाढी वारीनिमित्त #शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या वतीने पाठवण्यात येणाऱ्या वारकरी सेवा रथाला भगवा झेंडा दाखवून हा रथ पंढरपूरकडे मार्गस्थ केला.
या रथाच्या माध्यमातून वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना रेनकोट, छत्री, पादत्राणे, वैद्यकीय किट, नॅपकिन आदी वस्तूंचे विनामूल्य वाटप करण्यात येणार आहे. वारीसाठी पायी जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा घडावी एवढाच प्रामाणिक उद्देश यामागे आहे.
यावेळी शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले , श्री कृतज्ञता ट्रस्ट ह भ प प्रोफेसर दिनेशजी महाराज औटी , ह भ प सतीश महाराज शिंदे , ह भ प सागर महाराज थोरात , ह भ प पांचाळ गुरुजी आणि वारकरी संप्रदायातील प्रमुख मंडळी उपस्थित होती.